उरुळी कांचनजवळील कालव्यात चारचाकी कोसळली; एक ठार, तर तिघं जखमी - Pune News - PUNE NEWS
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 23, 2024, 2:24 PM IST
पुणे Pune Accident : उरुळी कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याचा लोखंडी कठडा तोडून कार गाडी पाण्यात पडली. या घटनेत एकाचा जागेवर मृत्यू झालाय. तर अन्य तिघे जखमी झालेत. हा अपघात गुरुवारी (23 मे) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. अपघातात अमर साहेबराव घाडगे (वय 28 रा.जुन्नर) या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश संजय थोरात (वय 22) आणि शुभम शंकर इंगोले (वय 21, रा. दोघंही केसनंद ता. हवेली) आणि आदित्य महादेव तावरे (वय 20 रा.जुन्नर) अशी जखमी झालेल्या तिघांची नाव आहेत. तर गाडी कोसळल्याची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदत केली. घटना घडल्यानंतर सदर ठिकाणी तब्बल दीड ते दोन तासांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली असल्याचं काही नागरिकांनी सांगितलं. तर याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.