पुण्यात पुरसदृश परिस्थिती, सिंहगड रोड संपूर्ण पाण्यात; प्रशासनाच्या वतीनं बचावकार्य सुरू - Pune Rain Updates - PUNE RAIN UPDATES

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 4:10 PM IST

पुणे Pune Rain News : पुणे शहर तसंच आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. (Pune Rain Updates) या पावसामुळं खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्यामुळं सिंहगड रोड येथील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. काही सोसायट्यांचा पार्किंग परिसर हा संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. तर काही घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना रात्र जागून काढावी लागलीय. नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिकेकडून आता बचावकार्य सुरू करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, या बचावकार्यासाठी आठ बोट तैणात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सिंहगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी आणि इतर तीन सोसायटीमध्ये पाणी साचलंय. नदीपात्र रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौकामध्ये देखील कमरेइतकं पाणी साचलंय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.