'बाबा भिडे' पूल पाण्याखाली, स्टॉल हलवताना करंट लागून तिघांचा मृत्यू - Pune Rain News
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 25, 2024, 10:07 AM IST
पुणे Pune Rain Updates : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं 'बाबा भिडे' पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळं नदीपात्रातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर नागरिकांनी नदीपात्रा शेजारी जाऊ नये आणि सतर्क रहावं असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान, असं असतानाच रात्री तीन वाजण्याच्या सुमारास भिडे पूल परिसरातील झेड पूलखालील नदीपात्रात पाण्याची पातळी अचान वाढली. या पुलाखाली अंडाभुर्जी स्टॉलवर काम करणारे तीनजण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. पहाटे पाच वाजता तिघांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अभिषेक अजय घाणेकर (वय-25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (वय-21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) आणि शिवा जिदबहादुर परिहार (वय-18, नेपाळी कामगार) अशी मृतांची नावं आहेत.