आई ती आईच! दोन जणांचा जीव घेणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाची आई म्हणाली, "तो व्हिडिओ माझ्या मुलाचा..." - Pune Hit and Run
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 23, 2024, 10:54 PM IST
पुणे Pune Hit and Run Case : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यात तो अपघातनंतर एक रॅप बनवून अश्लील बोलत असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडिओ बाबत त्या अल्पवयीन मुलाच्या आईनं खुलासा केलाय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांच्या मुलाचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ माझ्या मुलाचा नसून फेक व्हिडिओ आहे, अस अल्पवयीन तरुणाच्या आईनं स्पष्ट केलंय. शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगर इथं पार्टी करुन जात असलेल्या तरुणानं भरधाव गाडीनं 2 जणांना चिरडलं असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चांगलंच या घटनेमुळं चांगलंच वाचावरण तापलं होतं.