'गोल्डमॅन' सनी वाघचौरे कुटुंबास 25 किलो सोनं घालून तिरुपतीच्या दर्शनाला, पहा व्हिडिओ - Pune Goldman - PUNE GOLDMAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 23, 2024, 10:59 PM IST
तिरुपती : पुण्याचा 'गोल्डमॅन' म्हणून लोकप्रिय असलेल्या सनी नानासाहेब वाघचौरे यांनं आपल्या कुटूंबासोबत तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी जगभरातून तिरुमला येथे येणाऱ्या यात्रेकरूंना तिरुमला तिरुपती देवस्थानकडून श्रीवारी सेवा राबविण्यात येते. याच सेवेत सनी वाघचौरे यांनी सहभाग घेतला. तिरुमला येथे आलेल्या सनीच्या कुटुंबीयांनी घातलेले सोन्याचे दागिने पाहण्यासाठी भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. त्यांनी सुमारे 25 किलो सोन्याचे दागिने घातले होते. सनीला अंगावर सोनं घालण्याची आवड आहे. तो फक्त अंगावरच सोनं घालत नाही, तर त्याचे बूट आणि मोबाईलही सोन्याचा आहे. त्यानं त्याच्या कारलाही सोन्याचा मुलामा दिलाय. बिग बॉस हिंदीमध्येही वाईल्ड कार्ड एन्ट्रीसह सनी वाघचौरे झळकला होता.