पुणे- कोरेगाव भीमा लढाईचा आज २०७ व्या वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त कोरेगाव भीम येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखेो अनुयायांनी गर्दी केली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, " हा एक महत्त्वाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या भारतासाठी मोठं योगदान दिलं. आपला देश त्यांच्या घटनेनुसार चालतो".
विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि अनुयायांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. आज पहाटे धम्मयाचना, भारतीय बौद्ध महसभा,सामुदायिक बुद्ध वंदना आणि त्यानतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी आणि मानवंदना कार्यक्रम पार पडला. मंगळवारी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायींनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आनंदराज आंबेडकर यांसह इतर नेत्यांनी भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केलं आहे.
सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत, ही चांगली चांगली आहे. सरकार पुरवलेल्या सुविधा कमी पडत आहेत. बार्टी यात लक्ष घालेल अशी अपेक्षा आहे. शारीरिक संघर्षा संपला तरी मानसिकरित्या अजूनही संघर्ष सुरूच आहे, असं मी मानतो-प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष
#WATCH | Pune, Maharashtra | People gather at Bhima Koregaon on the 207th anniversary of the Bhima-Koregaon Battle to pay tribute at Vijay Stambh. pic.twitter.com/CdqChhyPVw
— ANI (@ANI) January 1, 2025
बीडच्या घटनेबाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, ","समाजातील विषमता अणि अमानुष याविरोधात चळवळ सुरू राहिली पाहिजे. राज्यात परभणी आणि बीडची घटना घडल्या आहेत. बीड प्रकरणी लढ्याला रंग दिला जात आहे. पोलीस खात्याला कराड कुठं होता? हे माहिती नव्हते, याचं मला आश्चर्य वाटत आहे. हे पोलीस खात्याचं अपयश होते. गुप्तचर संस्थांनी आपलं अपयश वारंवार समोर आणू नये. कराड प्रकरणी सरकारवर दबाव आहे, हे मात्र नक्की आहे. त्या दबावाला मुख्यमंत्र्यानी बळी पडू नये".
यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, " मी नाराज नसून मंत्री म्हणून चांगलं काम करणार आहे. मी पुढच्या आठवड्यात मुंबईला जाऊन नक्की माझा पदभार स्वीकारणार आहे. गेली दहा वर्ष मी काम करतो आहे. मध्यंतरी सुट्टीवरती गेलो होतो". पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार की भाजपाचे आमदार चंद्रकात पाटील होणार, याबाबत राज्य सरकारनं निर्णय जाहीर केलेला नाही. त्यावर मंत्री भरणे म्हणाले, पुण्याचे पालकमंत्री निश्चितपणे अजित पवार होणार आहेत".
#WATCH | Pune, Maharashtra | On arrangements at Bhima Koregaon on the 207th anniversary of the Bhima-Koregaon Battle, Pune District Collector Dr Suhas Diwase says, " more than 8-10 lakh followers are expected to visit... we have identified more than 45 places, about 280 acres of… pic.twitter.com/iKYLYmiPoj
— ANI (@ANI) January 1, 2025
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, "8 ते 10 लाखांहून अधिक अनुयायी भेट देतील, असा अंदाज आहे. आम्ही सुमारे 45 एकरवर सुमारे 280 एकर पार्किंगसाठी जागा निश्चित केली आहे. तर 40 हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. या बाजारपेठेतील रस्त्यांवर अकराशेहून अधिक बस धावत आहेत. 8 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल सारख्या पथकांचे 13 हजार कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत".
- कशामुळे साजरा कैला जातो शौर्य दिन? पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नदीच्या काठावर 1 जानेवारी 1818 ला दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये झालेल्या युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ इंग्रजांनी विजयस्तंभ उभारला. या विजयस्तंभावर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरली. त्यामुळे कोरेगाव भीमा येथे शौर्य दिन साजरा करण्यात येतो.
जमिनीच्या वादामुळे दरवर्षी सरकारला घ्यावी लागती परवानगी- ऐतिहासिक कोरेगाव भीमा लढाईच्या 207 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला पुण्यातील 'जय स्तंभ' जमिनीवर पंधरा दिवसांसाठी प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. पुण्यातील पेरणे गावात असलेली ही जमीन मालकी हक्काच्या वादात अडक्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं होतं. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे विजय स्तंभ येथे येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षा आणि इतर कार्यक्रमाचं नियोजन करण्याकरिता राज्य सरकारला दरवर्षी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्रीपासून 5 जानेवारी 2025 पर्यंत जनतेला आणि सरकारला विजयस्तंभ परिसरात प्रवेश करण्याची आणि भेट देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पेशवाईत अन्याय - ‘द ट्राईब्स एंड कास्टस ऑफ द सेन्ट्रल प्राविंसेस ऑफ इंडिया’ (1916) या पुस्तकात आर. व्ही. रसाळ यांनी पेशवाईत मागासवर्गींयावर अन्याय झाल्याचं म्हटलं. त्यांनी पुस्तकात म्हटलं, 'पेशव्यांच्या राजवटीतील मागासवर्गीयांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती. म्हणूनच मागासवर्गीयांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते. रस्त्यातून चालतांना पावलांचे ठसे मिटावेत म्हणून त्यांच्या कंबराला काटेरी झाडाची फांदी बांधली जायची. त्यामुळे मागासवर्गीयांच्या पायांचे चालण्याचे ठसे मिटत असे".
महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शौर्य दिनानिमित्त एक्स मीडियावर पोस्ट केली. त्यांनी म्हटलं, " भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. 500 सैनिक आणि अलुतेदार सैन्यानं त्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा. बाबासाहेबांना जे हवे होते, तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून त्याचा वापर करा. आज आणि नजीकच्या काळात तुम्ही विजयस्तंभाला भेट देताना सैनिकांचा सन्मान करा बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या. एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती त्यातूनच उभी राहू शकते".
हेही वाचा-