ETV Bharat / entertainment

'गेम चेंजर' ते 'स्काय फोर्स'पर्यंत, 'हे' बॉलिवूड - साऊथ चित्रपट होईल जानेवारी 2025मध्ये रिलीज - BOLLYWOOD AND SOUTH FILMS

बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट जानेवारी 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहेत. आता आम्ही तुमच्यासाठी यादी घेऊन आलो आहोत.

bollywood and south films
बॉलिवूड - साऊथ चित्रपट ((Film Posters) bollywood and south films)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 1, 2025, 10:10 AM IST

मुंबई : वर्ष 2025 सुरू झालं असून बॉलिवूड आणि साऊथचे अनेक चित्रपट जानेवारीमध्ये रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर आता प्रेक्षकांना या जानेवारीमध्ये मनोरंजनाचा डोस मिळणार आहे. 2024 वर्ष चित्रपटसृष्टीसाठी खूप चांगलं होत. आता 2025 हे वर्ष कसं राहिल, हे काही दिवसांमध्ये समजेल. चला तर मग आता पाहूया, जानेवारी 2025मध्ये कुठले चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल.

बॉलिवूड-साऊथ चित्रपट जानेवारी 2025मध्ये प्रदर्शित होईल

1. फतेह- अभिनेता सोनू सूदचा 'फतेह' 10 जानेवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटातून त्यानं दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. 'फतेह' ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात सोनू सूद मुख्य भूमिकेत असणार आहे. याशिवाय 'फतेह'मध्ये जॅकलिन फर्नांडिस, नसीरुद्दीन शाह आणि विजय राज यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चित्रपट विश्लेषकांच्या मते, 'फतेह' बॉक्स ऑफिसवर 2 ते 3 कोटी रुपयांची कमाई करून चांगली सुरुवात करू शकतो.

2. गेम चेंजर : एस. शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर' पॉलिटिकल ड्रामा 10 जानेवारी 2025ला बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहे. या चित्रपटामध्ये राम चरण दुहेरी भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची कहाणी, राम नंदन या आयएएस अधिकाऱ्याची आहे, जो भ्रष्ट राजकारण्यांशी लढतो आणि त्याच्या वडिलांच्या भूतकाळातील धक्कादायक सत्ये उघड करतो. या चित्रपटात राम चरणबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे. कियारा पहिल्यांदाच राम चरणबरोबर स्क्रिन शेअर करत आहे.

3. विदामुयार्ची : 1997च्या अमेरिकन चित्रपट 'ब्रेकडाउन'पासून प्रेरित, 'विदामुयार्ची'मध्ये अभिनेता अजित कुमार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी रिलीज होईल. 'विदामुयार्ची' चित्रपट एका व्यक्तीच्या प्रवासावर आधारित आहे, जो आपल्या हरवलेल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याची पत्नी धोकादायक गुंडाच्या जाळ्यात अडकलेली असते. आता हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवण्यासाठी आता सज्ज आहे.

4. इमर्जन्सी : अभिनेत्री कंगना राणौतचा बहुप्रतीक्षित 'इमर्जन्सी' हा अखेर 17 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कंगनानं स्वत: केलं आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त श्रेयस तळपदे, अनुपम खेर, विशाक नायर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

5. आझाद : अभिषेक कपूर दिग्दर्शित, 'आझाद' या चित्रपटातून अमन देवगण आणि राशा थडानी डेब्यू करणार आहेत. अजय देवगणनेही या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.

6. स्काय फोर्स : अभिनेता अक्षय कुमार आणि वीर पहारिया स्टारर एरियल ॲक्शन ड्रामा 'स्काय फोर्स' 24 जानेवारी 2025 रोजी पडद्यावर येत आहे. संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर दिग्दर्शित 'स्काय फोर्स'चा ट्रेलर 3 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार चांगला कमबॅक करू शकतो, अशी आशा प्रेक्षकांना आहेत.

7. देवा : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री पूजा हेगडे अभिनीत 'देवा' 31 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रोशन ॲन्ड्र्यूज दिग्दर्शित हा चित्रपट चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. शाहिद कपूरचा मागील रिलीज 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता शाहिदला त्याच्या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.