लोकसभा निवडणूक 2024; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणीतील सभा लाईव्ह - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 20, 2024, 12:35 PM IST
|Updated : Apr 20, 2024, 12:54 PM IST
परभणी Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नांदेड इथं जाहीर सभा घेतली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परभणीत सभा घेत आहेत. परभणीत महाविकास आघाडीनं महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीनं रासप नेते महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणी इथं येत असल्यानं महायुतीचे दिग्गज नेते परभणीत येत आहेत. विशेष म्हणजे महायुतीत असूनही महादेव जानकर हे त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत.
Last Updated : Apr 20, 2024, 12:54 PM IST