पिंपरी चिंचवड : मोबाईल गेमच्या नादात 16 वर्षीय मुलानं संपवलं जीवन; पोलीस उपायुक्तांनी पालकांना केलं 'हे' आवाहन - pimpri chinchwad

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 12:23 PM IST

thumbnail
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे (ETV Bharat Reporter)

पिंपरी चिंचवड Young Boy Commit Suicide : वयाने मोठी माणसं सोशल मीडियाच्या अधीन झाली आहेत, तर लहान मुलं सेलफोनच्या नादी लागली आहेत. मात्र, सेलफोनचं वेड हळू-हळू व्यसन बनतं आणि त्यातूनच मुलं टोकाचं पाऊल उचलतात. यापूर्वी सेलफोन व्यसनाधिनता आणि सेलफोन गेमिंगच्या नादातून अशा घटना घडल्या आहेत. आता, पिंपरी चिंचवडमधील किवळे परिसरातही अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. दहावीत शिकणाऱ्या मुलाला गेमचं व्यसन जडलं आणि या व्यसनाच्या तो इतका आहारी गेला की, याचा शेवट आत्महत्येनं झाला. तसंच या मुलानं सुसाईड नोटमध्ये 'लॉग आऊट एक्स डी' असं लिहिलं होतं. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पालकांना आवाहन करत पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे म्हणाल्या की, "आपल्या मुलांचा 'स्क्रीन टाईम' मर्यादित करा. आपली मुलं नक्की मोबाईलमध्ये काय बघताय याची माहिती घेत रहावी. तसंच सेलफोनचं कंट्रोल आपल्याकडं राहू द्यावं. मुलांना आवश्यकतेपेक्षा अधिक वेळ सेलफोन देणं टाळावं आणि दिलाच तर ते कोणत्या साईटस् बघताय याकडं लक्ष द्यावं." 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.