नेपाळमधील अपघातात जळगावमधील 14 जणांचा मृत्यू, मंत्री अनिल पाटीलसह आमदार संजय सावकारे काय म्हणाले? - Nepal Bus Accident - NEPAL BUS ACCIDENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 23, 2024, 5:47 PM IST
जळगाव Nepal Bus Accident : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 40 पर्यटकांना घेऊन जाणारी प्रवासी बस नदीच्या पात्रात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. यामध्ये 31 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. नेपाळमधील अपघाताबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, "मला तासाभरापूर्वी अशी दुर्दैवी घटना घडल्याचं समजलं. मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबतही यासंदर्भात चर्चा केलीय. नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाल्याची माहिती आहे. 41 भाविक बसमध्ये होते. यातील अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाहीय. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसंच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आताच सर्व गोष्टी जाहीर करणं शक्य नाही. पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणांसोबत आम्ही संपर्कात आहोत. तसंच जखमींना तात्काळ मदत करण्याच्या सुचना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे". ते आज जळगावात पत्रकार परिषदेत बोलत होते.
"400 फूट दरीत यात्रेकरुंची बस कोसळली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नेपाळमधील सरकारकडून मदतकार्य सुरू केलं आहे. त्यामधील 31 जणांना दुखापत झालीय. काही जणांचा शोध सुरू आहे. वरणगाव, पिंपळगाव, तळवेल गावातील हे पर्यटक आहेत. हे यात्रेकरु 8 ते 10 दिवसांपूर्वी गेले नेपाळला गेले होते. आम्ही 20 तारखेला अयोध्येत दर्शन घेऊन परतलो, मात्र, ते नेपाळला गेले"- संजय सावकारे, आमदार भाजपा