जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार; वडगाव शेरी मतदारसंघातून बापू पठारे यांना उमेदवारी - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 24, 2024, 8:51 PM IST
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामला सुरूवात झालीय. तर सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात येत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली 45 उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात पुण्यातील वडगांव शेरी मतदारसंघातून माजी आमदार बापू पठारे यांना उमेदवारी जाहीर झालीय. यावेळी बापू पठारे म्हणाले की, " वडगांव शेरी मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार". तसेच ही निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
अशी केली राजकीय जीवनास सुरुवात : बापू पठारे याचा सरपंच ते आमदार असा प्रवास आहे. खराडीमधून सरपंच होऊन त्यांची राजकीय जीवनास सुरुवात झालीय. नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि नंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर 2009 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. पण त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. नंतर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परत आले. आता दुसऱ्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.