"चद्दर लगी फटने खैरात लगी बटने"; जयंत पाटीलांची अर्थसंकल्पावरुन मार्मिक टीका, पाहा व्हिडिओ - Jayant Patil on Budget - JAYANT PATIL ON BUDGET
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 28, 2024, 10:31 PM IST
मुंबई Jayant Patil on Budget : महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडला. या अर्थसंकल्पात जनतेसाठी घोषणांचा पाऊस पाडला असून हा अर्थसंकल्प म्हणजे "चद्दर लगी फटने और खैरात लगी बटने" अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, "आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा एकंदरीत चांगलाच परिणाम राज्यात झालेल्या दिसून येतोय. महायुतीला या लोकसभा निवडणुकीत सपाट्यानं मार खावा लागला. आता येणाऱ्या विधानसभेत सुद्धा त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्याकारणानं आजच्या अर्थसंकल्पातून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अतिशय बेजबाबदारपणे त्यांनी हे बजेट मांडलं आहे." जयंत पाटील आणखी काय म्हणाले ते ऐकाच...