भव्य रॅली काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भरणार उमेदवारी अर्ज - DEVENDRA FADNAVIS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 25, 2024, 10:48 AM IST
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (25 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संविधान चौकातून रॅलीला प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज नागपूर तहसील कार्यालयात सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत. तर त्यानंतर नव्यानं तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळं सलग 5 वेळा निवडून आलेल्या देवेंद्र फडणवीसांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. 1999 पासून त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.