तांत्रिक बिघाडामुळं नागपूर मेट्रो सेवेत व्यत्यय; 1 ते दीड तास सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय - Nagpur Metro service disrupted - NAGPUR METRO SERVICE DISRUPTED
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 6, 2024, 11:58 AM IST
नागपूर Nagpur Metro : नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन जवळ OHE (ओव्हर हेड इक्विपमेंट) संबंधित झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं त्या मार्गिकेवरील सेवा सुमारे एक तासभर बंद होती. तांत्रिक बिघाडामुळं सेवा बंद पडल्यानं नागपूर मेट्रोच्या प्रवाश्यांची गैरसोय झाली. त्यामुळं खापरी आणि ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान मेट्रो मार्गिकेवरील सेवा ठप्प झाली होती. बिघाड समजल्यावर नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं पाऊलं उचलली. मिहान डेपो येथून कॅटनरी मेंटेनन्स व्हीकल बिघाड झालेल्या ठिकाणी पोचली आणि त्या संबंधी काम सुरु केलं. एका तासात डाऊन मार्गिकेवरील मेट्रो सेवा आणि त्यानंतर 8 च्या सुमारास अप मार्गिकेवरील सेवा पूर्ववत करण्यात. रात्री 8:20 पर्यंत दोन्हीही अप आणि डाऊन मार्गिकेवरील मेट्रो सेवा सुरळीत झाली होती.