मुंबईत कामाठीपुरा परिसरातील रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; एकाचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल - Kamathipura fire watch video

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ANI

Published : Jan 26, 2024, 7:22 AM IST

Updated : Jan 26, 2024, 11:18 AM IST

मुंबई Fire Breaks out at Grant road  : मुंबईतील ग्रँट रोडवरील कामाठीपुरा परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये पहाटे 2 वाजता अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाला दूरवरुन दिसत होत्या. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत लाकडाचं गोदाम जळून खाक झालंय. तसंच मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्तीचा मृत्यू झालाय. या आगीमुळं मोठं नुकसान झालंय. आग लागल्यानंतर इमारतीबाहेर लोकांची गर्दी झालीय. ही आग 7000 चौरस फूट ते 8000 चौरस फूट क्षेत्रफळातील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या आगीत लाकडाचा साठा, रसायनांचा साठा आल्यानं इमारतीच्या एक आणि अंशतः वरच्या दोन मजल्यांना त्याची झळ बसलीय. मध्यरात्री ही आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आग लागण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. 

Last Updated : Jan 26, 2024, 11:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.