शिवस्वराज्य यात्रेच्या पाचव्या सभेत खासदार अमोल कोल्हेंची जोरदार बॅटिंग! - Shiv Swarajya Yatra - SHIV SWARAJYA YATRA

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 1:59 PM IST

पुणे Shiv Swarajya Yatra "सकाळपासून शिवस्वराज्य यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. मुळात महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढा पुकारला आहे. हा महाराष्ट्रातील नागरिक, युवक, माता-भगिनी आणि शेतकऱ्यांचा लढा आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे वातावरण होतं, त्यात किती तरी पटीनं वाढ झाली आहे. हे आजच्या शिवस्वराज्य यात्रेच्या संपूर्ण प्रतिसादावरुन दिसलं. जनतेनं उत्स्फुर्त प्रतिसाद दिसलं. महायुतीच्या खोके सरकार विषयी सर्वसामान्य मराठी तरुणांमध्ये  प्रचंड रोष आहे. पत्रकार बंधुनी आपल्या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून कुणाचं दोनशे कोटीचं हॉटेल लंडनमध्ये आहे, हे शोधावं. पालकमंत्री पिपंरी चिंचवड महानगरपालिकेच्या भष्ट्राचाराकडं लक्ष देणार का, हा महत्वाचा मुद्दा आहे. अमित शाह जेव्हा आले होते, तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. निवडणुकीत कसा फायदा तोटा होतो हे सांगण्यापेक्षा कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा, हे कधी सांगताहेत, याची महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी वाट बघतोय," अशी टीका खासदार अमोल कोल्हेंनी राज्य सरकारवर केली. तर "महाविकास आघाडीचे 54 आमदार हे शिवस्वराज्य यात्रेमुळे निवडून आले. मी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जावून आलोय, ज्या ठिकाणी उमेदवार उभे राहायला तयार नव्हते, त्या ठिकणी आता चार-चार जण वाद घालत आहेत की, आम्हाला उमेदवारी पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात चित्र चांगलं आहे. 54 आमदार मागच्या वेळी निवडून आलेत. यावेळी आम्ही महाविकास आघाडीचे 175 पेक्षा जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडं आमचं लक्ष आहे," असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.