ETV Bharat / state

वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड सत्र न्यायालयात सुनावणी - BEED SARPANCH MURDER CASE

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडला बीड सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराड सीआयडी कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत जाणार आहे.

Beed Sarpanch murder case
वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 11:59 AM IST

Updated : Jan 22, 2025, 12:13 PM IST

बीड- मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या मकोका अंतर्गत प्रकरणाची आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

वाल्मिक कराडला 15 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्यानं त्याच्या प्रकरणावर बीड सत्र न्यायालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली. सीआयडीकडून वाल्मिक कराडची कोठडी वाढवून मिळण्याची न्यायालयात विनंती करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायालयानं खंडणी आणि मकोका या गुन्ह्यांतर्गत वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सीडीआर समोर यावेत-सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे यांनी मंगळवारी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, " खंडणी मागायला लावणारी वेगळी टीम, खून करायला लावणारी वेगळी टीम आहे. खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचणारा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. हा मुख्य आरोपी झाला पाहिजे. खून आणि खंडणी प्रकरणातील फरार असलेले आरोपी कोणाच्या संपर्कात होते? यांचे सीडीआर समोर आले पाहिजे. त्या काळात कोणत्या मंत्र्यांनी फोन केले? हेही समोर आले पाहिजे. विष्णू चाटेनं फेकून दिलेला फोन कसा सापडत नाही?"

ईडीनं कारवाई का केली नाही?पुढे जरांगे म्हणाले, " देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. हे आरोपी सुटून आल्यावर हे कुटुंबातील व्यक्तीची हत्या करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी या टोळ्यांचा मुळासकट सुपडा साफ करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्यावरचा जनतेचा विश्वास उडून जाईल. सापडलेली वाल्मीक कराड यांची प्रॉपर्टी नाही. ती सरकारमधील एका मंत्राच्याची प्रॉपर्टी आहे. एवढी प्रॉपर्टी असेल तर ईडीनं कारवाई का केली नाही?

हेही वाचा-

  1. संतोष देशमुख खून प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, वाल्मिक कराडच्या सुनावणीवर वकील म्हणाले . . .
  2. संतोष देशमुख हत्याकांड; सहा आरोपींना न्यायालयात करणार हजर, तर वाल्मिक कराडच्या जामिनावर आज होणार फैसला
  3. संतोष देशमुख हत्याकांड: वाल्मिक कराडनं दिंडोरीतील स्वामी समर्थ आश्रमात ठोकला मुक्काम, विश्वस्त म्हणाले . .

Last Updated : Jan 22, 2025, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.