कोलकाता IND vs ENG 1st T20I : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील पाच सामवन्यांची T20 मालिका 22 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यातील पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन्ही संघांमधील T20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत या मालिकेत अनेक मोठे विक्रम बनण्याची आणि तुटण्याची शक्यता आहे. या T20 मालिकेत कोणते खेळाडू नवीन इतिहास रचू शकतात ते पाहूया.
📍 Kolkata
— BCCI (@BCCI) January 20, 2025
Gearing 🆙 for the #INDvENG T20I series opener 😎#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ocvsS4Y4R3
अर्शदीप सिंग इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर : भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं टीम इंडियासाठी 60 T20 डावांमध्ये 95 विकेट्स घेतल्या आहेत. जर या वेगवान गोलंदाजानं त्याच्या नावावर आणखी दोन बळी घेतले तर तो युजवेंद्र चहल (96) ला मागे टाकून T20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. शिवाय, अर्शदीप सिंग T20 मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला T20 मध्ये 100 बळी घेता आलेले नाहीत. आता अर्शदीपला हा सुवर्ण विक्रम रचण्याची संधी आहे.
जॉस बटलर एका खास क्लबमध्ये मिळवेल स्थान : इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनं भारताविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये 498 धावा केल्या आहेत. बटलर दोन धावा करताच भारताविरुद्ध T20 मध्ये 500 धावा करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज बनेल. निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर आणि आरोन फिंच यांच्यानंतर तो भारताविरुद्ध 500 T20I धावा पूर्ण करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरेल.
🤝 " i've been looking forwards to working with baz for a long time"
— England Cricket (@englandcricket) January 21, 2025
🇮🇳 "playing in india is always a treat for any cricketer"
😃 "i've been practicing my smiling in the mirror!"
watch the full interview with @josbuttler ahead of our opening T20I match in Kolkata tomorrow 👇 pic.twitter.com/EVTCeFeyNi
सूर्यकुमार आणि बटलर यांच्यात स्पर्धा : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इंग्लंडचा जॉस बटलर यांनी त्यांच्या T20 कारकिर्दीत अनुक्रमे 145 आणि 146 षटकार मारले आहेत. जर या दोन्ही क्रिकेटपटूंनी मालिकेत 150 षटकार मारले तर ते रोहित शर्मा (205), मार्टिन गुप्टिल (173) आणि मोहम्मद वसीम (158) नंतर T20 इतिहासात 150 षटकार मारणारे जगातील चौथे आणि पाचवे फलंदाज बनतील. तथापि, कोणता खेळाडू प्रथम 150 षटकारांचा आकडा गाठण्यात यशस्वी होतो हे पाहणं मनोरंजक असेल.
Lights 🔛
— BCCI (@BCCI) January 21, 2025
Smiles 🔛
Headshots ✅#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/C5un9Le8HD
संजू आणि फिल साल्ट यांनाही विक्रम करण्याची संधी : संजू सॅमसन आणि फिल साल्ट या दोघांनीही प्रत्येकी तीन T20 शतकं झळकावली आहेत. जर दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाजांनी आणखी एक शतक झळकावलं तर ते सूर्यकुमार यादव (4 शतकं) याच्यासह T20 क्रिकेटमध्ये संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज बनतील. शिवाय, जर या मालिकेत दोन्ही क्रिकेटपटूंपैकी कोणीही आणखी दोन शतकं केली तर ते रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल (5 शतकं) यांच्या सर्वकालीन विक्रमाची बरोबरी करतील.
हेही वाचा :