रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेनं भरवली भ्रष्टाचाराची शाळा; पाहा व्हिडिओ - MNS Protest

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 2:41 PM IST

thumbnail
रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन (ETV Bharat Reporter)

मुंबई MNS Protest Against Potholes : मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून या महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालय. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून त्याचं काम आता अंतिम टप्प्यात असल्याचा दावा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. मात्र ,असं असलं तरी पनवेल पळस्पे फाटा येथे या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आणि भगदाडं पडली असल्याचा आरोप मनसे नेते योगेश चिले यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांच्या नेतृत्वाखाली पळस्पे फाटा येथे रस्त्यावर पडलेल्या भगदाडांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडत हातात विविध विभागांचं फलक घेतला. या विभागांचं प्रतिनिधित्व करत शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे आंदोलकांनी भ्रष्टाचाराची शाळाच रस्त्यावर भरवली. यावेळी मनसे नेते योगेश चिले यांनी शिक्षकाची भूमिका करत प्रत्येक विभागानं कसा घोटाळा सुरू केलाय आणि त्यामुळं रस्त्याची कशी दुरवस्था होत आहे, याचा पाढा वाचला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.