साईबाबा मंदिर वर्धापन दिन कार्यक्रमात दक्षिणेतील भाविकांनी मराठीसह तेलगू गाण्याच्या तालावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ - Saibaba Temple Anniversary
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 16, 2024, 8:06 PM IST
अहमदनगर: कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे साईबाबा मंदिराचा 3 रा वर्धापन दिन सोहळा आज (16 फेब्रुवारी) अनेक संत महंताच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त हैद्राबाद येथील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थि होते. यावेळी मराठी, हिंदी आणि तेलगू गाण्याच्या तालावर ठेका धरण्याचा दक्षिणेतील भाविकांना मोह आवरला नाही. लेझीम, फटाक्यांची आतिषबाजी तसेच डिजेच्या तालावर वाजत गाजत मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावात पाहुण्यांची मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आलं. गावात जागोजागी पाहुण्यांवर पुष्पसुमनांची वर्षाव करून स्वागतासाठी सुवासिनींनी अंगणात सडा टाकून रस्त्याच्या दोन्ही बाजुला रांगोळी काढली. घरासमोर मिरवणूक येताच सुवासिनींनी पाहुण्यांचे आरती ओवाळून औक्षण केले. ग्रामस्थ यांच्याबरोबर पाहुण्यांनाही गाण्याच्या तालावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर राघवेश्वर मंदिरात भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हैद्राबाद येथील साईभक्त किर्ती गोपीकृष्णन आणि एस गोपीकृष्णन यांनी साईबाबा मूर्तीसाठी 7 लाख रुपये किंमतीचे गोल्डब्रासचे सिंहासन दान केले आहे. या अगोदर त्यांनी मंदिरासाठी 5 लाख रुपये किंमतीची साईबाबांची मूर्ती दान केली होती. तर दुसरे साईभक्त कल्पना आनंदजी यांनी मुर्तीसाठी चांदीचा टोप दान केला आहे.