आधी लगीन की आंदोलन : सोलापुरातील वधू वरानं आंदोलनात मांडला ठिय्या, वऱ्हाड्यांनी जोरदार केला रास्तारोको - bride and groom
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/24-02-2024/640-480-20830481-thumbnail-16x9-rasta-roko-andolan--in-solapur.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 24, 2024, 3:41 PM IST
सोलापूर Maratha Reservation Protest : राज्य सरकारनं सगेसोयरे अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. शनिवारपासून (24 फेब्रुवारी) गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करावं, असं आवाहनही जरांगेंनी केलंय. यावरुनच आता राज्यातील मराठा बांधव आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. याच पार्श्वभूमी आज अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सोलापुरातील सोलापूर-पुणे महामार्गावर शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनात वधू-वरासह संपूर्ण वऱ्हाडींनी सहभाग घेतला. प्रमोद विलास टेकाळे असं वराचं, तर प्रियांका अर्जुन मुळे असं वधूचं नाव आहे. शासनानं मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधूनच आरक्षण द्यावं, अशी मागणी करत रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेत वधू वर आणि वऱ्हाडीनं आरक्षणाची मागणी केली.