मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकलं, उपचारही केले बंद; नेमकं कारण काय?
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 20, 2024, 9:30 PM IST
जालना Manoj Jarange Patil News : राज्यातील शिंदे सरकारनं मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. या विधेयकामुळं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसंच त्यांनी आता स्वतःवरील उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं आता सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषद सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आपला रोष व्यक्त केला. त्यांनी हाताला लावलेली सलाईन काढून फेकली. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत पाणी आणि औषध घेणार नसल्याचं जाहीर केलं. पुढं ते म्हणाले की, आता माघार घेणार नाही. उद्या राज्यातील सगळ्या मराठा समाज बांधवांनी अंतरवाली सराटी येथे बैठकीला उपस्थित रहावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.