मनोज जरांगे पाटील 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'; पुण्यातील शांतता रॅलीत झळकले पोस्टर - Manoj Jarange Future CM Posters - MANOJ JARANGE FUTURE CM POSTERS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 11, 2024, 3:50 PM IST
पुणे Manoj Jarange Patil Pune Rally : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली काढली आहे. जरांगे यांच्या या शांतता रॅलीला पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात झाली. आज त्यांची रॅली पुणे शहरात आहे. या रॅलीला अनेक मराठा बांधवांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. सारसबाग येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे. तर गरवारे पूल छत्रपती संभाजी पुतळा येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स दिसून आले. या पोस्टर संदर्भात विचारले, "मराठा आरक्षणासाठी आम्ही मनोज जरांगेंना मुख्यमंत्री करू. तसंच गेल्या वर्षभरापासून जरांगे मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यामुळं आम्ही त्यांना सदैव साथ देऊ," अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली.