"बाप बाप होता है!" सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर, उदय सामंत यांच्या गावात लागले भाजपाचे बॅनर - BJP Banner War
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 16, 2024, 10:30 AM IST
रत्नागिरी Maharashtra Konkan Politics : सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर पाहायला मिळतोय. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपाकडून बॅनर लावण्यात आलंय. "बाप बाप होता है...झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है" अशा आशयाचं बॅनर येथे लावण्यात आलं. या बॅनरवर नारायण राणेंचा फोटोही बघायला मिळतोय. तर कणकवलीतील बॅनरचे हे पडसाद असल्याचं बोललं जातंय. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर 14 जून रोजी मोठे बॅनर लावण्यात आले होते. यात "वक्त आने दो... जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे" असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर भाजपाकडूनही कणकवलीत बॅनर लावून उत्तर देण्यात आलं होतं. असं असतानाच आज रत्नागिरीमध्येदेखील बॅनर लावण्यात आल्यामुळं आगामी निवडणुकांपर्यंत महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये जोरदार संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे.