''खाली डोकं वर पाय महायुती सरकार हाय हाय...'', विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी - Maharashtra Assembly Session - MAHARASHTRA ASSEMBLY SESSION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 27, 2024, 2:44 PM IST
मुंबई Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. तर उद्या या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला जाणार असून, सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे. पुढील तीन ते चार महिन्यात सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून सरकारविरोधात हातवारे करत जोरदार घोषणाबाजी केली. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी प्रश्नावर सरकार शांत का? कांदा दरवाढ, महिला अत्याचार, नीट परीक्षा आदी मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. "अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय महायुती सरकार हाय हाय", अशी घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात आली. तर पलीकडून सत्ताधारी पक्षाकडूनही "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.