बिबट्याची दहशत कायम; अहमदनगरच्या अंबिका नगरमध्ये एकावर हल्ला, पाहा व्हिडिओ - बिबट्याची दहशत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 10:32 PM IST

अहमदनगर Leopard Attack In Ahmednagar : शहरातील केडगाव परिसरातील अंबिकानगर भागात बिबट्या दिसल्यानं खळबळ उडाली आहे. परिसरातील एका व्यक्तीवर बिबट्यानं हल्ला केलाय. मात्र ही व्यक्ती बिबट्याच्या तावडीतून सुटली. परंतु हल्ल्यात सदर व्यक्ती जखमी झालीय. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी हा बिबट्या अंबिकानगर भागात काही लोकांना दिसला होता. (Leopard News) बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती लोकांनी वनविभागाला दिल्यावर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात आले. एकूणच बिबट्याची दहशत शहरी भागात वाढली असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागानं लवकरात लवकर बिबट्याला पकडावं, अशी मागणी नागरिकांनी केलीय. तसेच शहरात देखील पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ले करत असल्यानं त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची गरज निर्माण झालीय.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.