'लग्न कल्लोळ' चित्रपटाच्या यशासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचं साईंना साकडे, पाहा व्हिडिओ - सिद्धार्थ जाधव
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 29, 2024, 10:55 PM IST
अहमदनगर Lagna Kallol Movie : जिल्ह्यातील कोपरगावचे सुपुत्र असलेल्या डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्मित "लग्न कल्लोळ" चित्रपट उद्या 1 मार्चला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या यशासाठी निर्माते मयुर तिरमखे सह कलाकार सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख यांच्यासह टीमनं आज (29 फेब्रुवारी) शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत चित्रपटाचं पोस्टर साईचरणी लावत चित्रपटाच्या यशासाठी साईंना साकडं घातलयं.
सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, अभिनीत यांनी भूमिका केलेला "लग्न कल्लोळ" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि काही गाणी प्रदर्शित झाली. त्यामुळे चाहते चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट 1 मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या तीन गाण्यांना प्रेक्षकांनी आधीच चांगला प्रतिसाद दिलाय. आता चित्रपटालाही मायबाप रसिक प्रतिसाद देतील, असा विश्वास अभिनेता सिद्धार्थ जाधवनं साई दर्शनानंतर बोलताना व्यक्त केलाय.