खासगी बोटीतून समुद्रात पडलेल्या व्यक्तीला तटरक्षक दलाकडून जीवदान; पाहा व्हिडिओ - McGregor 6
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 4, 2024, 8:17 PM IST
मुंबई Indian Coast Guard Saved Life : एका खासगी बोटीमधून समुद्रात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आलंय. ही घटना मुंबई इथं घडलीय. मुंबई येथील समुद्रात खासगी Yatch McGregor 6 या बोटीमधून एक व्यक्ती समुद्रात पडला. याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली. माहिती मिळताच तटरक्षक दलाच्या C439 जहाजाद्वारे शोधमोहीम सुरू झाली. तटरक्षक दलाला तब्बल 3 तास शोध मोहिम राबवल्यानंतर या व्यक्तीचा शोध लावण्यात यश आलंय. समुद्रात पडलेली ही व्यक्ती जिवंत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तटरक्षक दलानं दिलीय. तटरक्षक दलानं दाखवलेल्या या साहसाचं सध्या सगळीकडे कौतुक केलं जातंय. तसंच समुद्रात प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन तटरक्षक दलाकडून करण्यात आलंय.