विजयी क्रिकेट टीमचं मुंबईत भव्य स्वागत - Cricket victory parade - CRICKET VICTORY PARADE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 4, 2024, 4:42 PM IST
|Updated : Jul 4, 2024, 9:36 PM IST
मुंबई - विश्वविजेती टीम इंडिया ही चमचमती ट्रॉफी घेऊन आज मायदेशी परतली. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर टीम इंडियाचं आगमन झालं. यावेळी क्रिकेटप्रेमींनी जल्लोषात खेळाडूंचं स्वागत केलं. त्यानंतर मुंबईत टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक निघत आहे. भारतीय क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी मुंबई सज्ज आहे. विमानतळावरुन एका उघड्या बसमधून टीम इंडियाचे खेळाडू वानखेडे स्टेडियमवर जातील. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज आहेत. दिल्लीवरुन खेळाडू मुंबई विमानतळावर उतरलेत. त्यामुळे मुंबईतील अनेक मार्ग बंद असतील. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. तसंच मिरवणुकीदरम्यान लोकलचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. रॅली निमित्त NCPA ते मेघदूत ब्रीजपर्यंत मरीन ड्राईव्हच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या रॅलीच्या अनुषंगानं मार्गावर काय-काय चाललंय ते लाईव्ह पाहूया.
Last Updated : Jul 4, 2024, 9:36 PM IST