होळीनिमित्त हास्य कवी डॉ. विष्णू सुरासे यांची खास कविता; पाहा व्हिडिओ - Holi 2024 - HOLI 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 25, 2024, 8:51 PM IST
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Holi Special Poem By Vishnu Surase : होळी हा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. या सणाला रंगांचा सण म्हणूनही ओळखलं जातं. तसंच या सणाला 'होळी पौर्णिमा' असंही म्हटलं जातं. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड आणि रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या रंगांची उधळण ही आयुष्याला देखील रंगीबेरंगी बनवायला मदत करते. त्यात सणांशी संबंधित कविता मनाला सुखावून टाकतात. होळीचा सण जसा मनाला आनंद देणारा सुखदायी असतो. तसंच कवितेने भरलेले शब्दाचे रंग देखील मनाला गारवा देऊन जातात. याच पार्श्वभूमीवर होळीचं औचित्य साधून हास्य कवी डॉक्टर विष्णू सुरासे यांनी ईटीव्ही प्रेक्षकांसाठी खास कविता सादर केली आहे. तसंच कवितेच्या माध्यमातून त्यांनी सध्याचा राजकीय परिस्थितीचं देखील वर्णन केलंय.