इंद्रायणी नदीत पाणी वाहतंय की फेस ? योगी निरंजन यांनी सरकारला दिला 'हा' इशारा - Indrayani River Pollution - INDRAYANI RIVER POLLUTION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 25, 2024, 1:27 PM IST
|Updated : Jun 25, 2024, 2:42 PM IST
आळंदी Indrayani River : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्याचं संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण सातत्यानं केमिकल मिश्रित पाणी थेट नदीत सोडलं जातं. त्यामुळे तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची अक्षरशः गटार गंगा झालीय. आषाढी वारी निमित्त देहू आणि आळंदीत येणारे लाखो वारकरी याच इंद्रायणीच्या पाण्यात आंघोळ करतात. लाखो भाविक तीर्थ म्हणून हे पाणी प्राशन करतात. त्यामुळं आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? वारंवार सांगूनही या नदी प्रदूषणाकडे लक्ष देत नसल्यानं सरकारची संवेदनशीलता संपलीय का? असा संताप व्यक्त करत आंदोलनं करण्यास भाग पाडू नका, अशा शब्दात आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांनी सरकारला इशारा दिलाय.