दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना आंध्रप्रदेश सरकारकडून आदरांजली; पाहा लाईव्ह - AP Govt Tribute To Ramoji Rao Live - AP GOVT TRIBUTE TO RAMOJI RAO LIVE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 27, 2024, 4:03 PM IST
|Updated : Jun 27, 2024, 6:36 PM IST
अमरावती (आंध्र प्रदेश) AP Govt Tribute To Ramoji Rao : रामोजी ग्रुपचे संस्थापक 'पद्मविभूषण' रामोजी राव यांचं 8 जून रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून माध्यम क्षेत्र, चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांना अभिवादन करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारनं आज विजयवाड्यातील कानुरूमध्ये स्मरण सभेचं आयोजन केलं आहे. रामोजी राव यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम हा राज्यस्तरीय असल्याचं जाहीर करणारं निवेदन आंध्रप्रदेश सरकारनं दिलं आहे. राज्याचा कार्यक्रम म्हणून आयोजित केलेल्या अभिवादन सभेसाठी 5 मंत्री आणि 12 अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना अभिवादन करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारनं स्मृती सभेचं आयोजन केलं. या अभिवादन सभेत रामोजी राव यांच्या जीवनाशी निगडीत लघुपट दाखवण्यात येत आहे.
Last Updated : Jun 27, 2024, 6:36 PM IST