छ. संभाजीनगरमध्ये गॅस टँकर उलटला; टँकरवर केला पाण्याचा जोरदार मारा - Gas leak
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 1, 2024, 10:01 AM IST
छत्रपती संभाजीनगर Gas Tanker Overturned : शहरातील सिडको चौकात एलपीजी गॅस टँकर डिव्हायडरला धडकल्यानं मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झालीय. सिडको उड्डाणपुलाच्या डिव्हायडरला एलपीजी गॅस वाहणाऱ्या टँकरने धडक दिली. यातील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळं टँकरवर अग्निशमन दलाच्या ६ टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला. यामुळं सदरील गॅस थंड राहून कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली. दरम्यान, सदर गॅस टँकरमुळं सिडको चौकातील संपूर्ण वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने सुरू आहे. नागरिकांनी देखील सिडको उड्डाणपूल, नाईक कॉलेज जवळील परिसरात काही तास जाणं टाळावं. याचबरोबर सिडको चौकातून मुकुंदवाडीकडे, वसेव्हन हीलकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सिडको भागातील नागरिकांना ज्वलनशील वस्तू पेटवू नका, असं आवाहन करण्यात आलंय.