LIVE : लाडक्या बाप्पाचं मुंबईत आगमन; 'लालबागचा राजा'चं दर्शन घेण्यासाठी लोटला जनसागर - Lalbaugcha Raja 2024 Live Dasrshan - LALBAUGCHA RAJA 2024 LIVE DASRSHAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 7, 2024, 11:23 AM IST
|Updated : Sep 7, 2024, 1:16 PM IST
मुंबई Lalbaugcha Raja 2024 Live Dasrshan : आजपासून भाविकांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानं देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मुंबईत आज सकाळपासून लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. लालबागचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते लालबागचा राजाची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर गणेशोत्सव 2024 चं रितसर उद्घाटन करण्यात आलं. सकाळी 6 वाजतापासून मोठ्या जल्लोषात भाविकांना दर्शन रांग खुली करण्यात आली. यावेळी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं. मुंबईत आज सकाळपासूनचं लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील भाविक मायानगरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरात मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळालं.
Last Updated : Sep 7, 2024, 1:16 PM IST