अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा; श्रीराम दरबाराची पंधराशे फुटांची भव्य रांगोळी, पाहा व्हिडिओ - ram temple

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 6:32 PM IST

नागपूर Ram Rangoli in Nagpur : अवघ्या देशाचं लक्ष २२ जानेवारीला अयोध्येकडं लागलं आहे. अयोध्येत सोमवारी (22 जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळा होणार आहे. त्यानिमित्त देशभरात अभूतपूर्व उत्साह बघायला मिळत आहे. सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे.  

श्रीराम दरबारची भव्य रांगोळी : नागपूरच्या संती गणेशोत्सव आणि सांस्कृतिक मंडळातर्फे (Sanskrutik Ganeshotsav Mandal) श्रीराम दरबारची तब्बल 1500 फुटांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. या बरोबर अयोध्येच्या इतिहासावर आधारित माहिती आणि चित्रप्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. संती गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणात भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी निकिती हिरूळकर या रामभक्त तरुणीने सहकाऱ्यांच्या मदतीने काढली आहे, त्यासाठी निकिताला १८ तास लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.