'जलसा' बंगल्याबाहेर बिग बींची एन्ट्री होताच चाहत्यांचा जल्लोष

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 10:02 PM IST

thumbnail

मुंबई Amitabh Bachchan : सुपरस्टार अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाहीत. अमिताभ बच्चन यांनी आज मुंबईतील त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर चाहत्यांची भेट घेत अभिवादनं केलं. त्यामुळं चाहत्यांनी यावेळी एकच जल्लोष केल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी बंगल्याबाहेर अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली झाली होती. दर रविवारी अमिताभ बच्चन त्यांच्या 'जलसा' बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांची भेट घेतात असतात. गेल्या 40 वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचा हा कार्यक्रम नित्य नियमानं दर रविवारी सुरू आहे. आजही त्यांनी  'जलसा' बंगल्याबाहेर येत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यामुळं चाहत्यांचीदेखील त्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. 'जलसा' बंगल्याबाहेर बीगबींची एन्ट्री होताचं चाहत्यांनी आनंद व्यक्त केल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी एक पांढरा कुर्ता घातला होता. तसंच त्यांच्या आंगावर लाल रंगाची शालदेखील होती. बिग बींची झलक मिळताच चाहत्यांनी त्यांचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.