ETV Bharat / politics

सर्वांसमोर ईव्हीएमच पोस्टमार्टम करा; आमदार रोहित पवार यांची निवडणूक आयोगाकडं मागणी - ROHIT PAWAR

आज पुण्यातील मगरपट्टा येथे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाकडं एक मोठी मागणी केली.

Rohit Pawar
रोहित पवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 8:15 PM IST

पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला झाल्याचं दिसून आलं. पण या वाढलेल्या मतदानावर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जातोय. बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशिनमध्ये फरक दिसतोय. मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. 'ईव्हीएम मशीनचे सर्वांसमोर पोस्टमार्टम करा, आमच्या तज्ञांकडून आम्ही आमच्या शंकांचं निरासरन करू', अशी मागणी त्यांनी केलीय.

आमच्या शंकांचं निरासरन करावं : आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानाची तफावत तसंच वाढलेलं मतदान आणि पोस्टल बॅलेटवर झालेलं मतदार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निवडणूक आयोगाने चार दिवस सर्व कॅमेरे आणि सर्व लोकांच्या समोर ईव्हीएम समोर आणून आमच्या शंकांचं निरासरन करावं अशी त्यांनी मागणी केलीय. तसंच आम्ही कुठेही रडीचा डाव खेळत नसून या निवडणुकीत लोकांच्यामध्ये जात असताना, लोकांची सरकारबाबत असलेली नाराजी दिसली. तसंच जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहता आम्हाला कमीत कमी १३० जागा तरी मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, आता जो निकाल लागला आहे तो पाहता कोणीच यावर विश्वास व्यक्त करत नाही. नागरिकांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जात असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना रोहित पवार (ETV Bharat Reporter)

...तर ते मिळून सरकार स्थापन करतील : यावेळी रोहित पवार यांना महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला आकडा जर बघितला तर एकनाथ शिंदे यांनी जर जास्त काळ घालवला तर भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करतील. तसंच जर अजित पवार यांनी वेळ घालवला तर भाजपा एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करतील. पण सध्या रटाळ पद्धतीनं राजकारण सुरू असून भाजपाचाच पाच वर्षासाठी मुख्यमंत्री असणार आहे. भाजपाकडून कसाही फॉर्म्युला देण्यात आला तरी पाच वर्ष त्यांचाच मुख्यमंत्री राहील".

हेही वाचा -

  1. "नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची दहशत"; रोहित पवारांचा गंभीर आरोप
  2. "महायुतीच्या नेत्यांनी 60 ते 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केलाय", रोहित पवार यांचा गंभीर आरोप
  3. सरकार भपकेबाज; विचारसरणी समजते, एसटीत हवाई सुंदरी आणण्यावरून रोहित पवार संतापले - ST Corporation Chairman

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.