मराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; पाहा व्हिडिओ - Raj Thackeray Vs Maratha Protestors - RAJ THACKERAY VS MARATHA PROTESTORS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 10:49 PM IST

धाराशिव Raj Thackeray Vs Maratha Protestors : सोलापूरमध्ये रविवारी (4 ऑगस्ट) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज?, असा सवाल केल्यानंतर राज ठाकरे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. राज ठाकरे आज सायंकाळी शहरातील हॉटेल पुष्पक येथे दाखल झाल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा तरुणांनी गर्दी केली. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्यानं गोंधळ उडाला. राज ठाकरे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर थांबले.  त्यांच्या रूमपर्यंत मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी जाऊ दिलं नाही. त्यामुळं पहिल्या मजल्यावरच घोषणाबाजी सुरू झाली. हे बघून राज ठाकरेंनी केवळ एका तरुणानं येऊन भेटावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु, तरुणांनी सगळ्यांनाच भेट घ्यायची आहे, असा पवित्रा घेतला. राज ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मुंबईतील नेत्यांनी मराठा कार्यकर्त्यांना दमबाजी केल्याचाही आरोप तरुणांनी यावेळी केला आहे. त्यामुळं वातावरण तणावपूर्ण झाले. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.