माजलगावातील अधिकमांस दीप अमावस्येच्या यात्रेचा 70 वर्षांची परंपरा; मंगलनाथ मंदिरात जलाभिषेकाला भाविकांची गर्दी - Adhikmaas Deep Amavasya Beed
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 4, 2024, 9:19 PM IST
बीड Adhikmaas Deep Amavasya Beed : माजलगाव येथे शंभू महादेवाच्या मंगलनाथ मंदिरामध्ये अधिक मास अमावस्या पूर्व काळानिमित्त परंपरेनुसार यात्रेचं आयोजन केल्या जातं. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. या ठिकाणी मागील 70 वर्षांपासून अधिक मास अमावस्या निमित्त भाविक भक्त शंभू महादेव मंगलनाथ मंदिराला सिंदफना नदीचे पाणी कावडीनं आणतात. तसेच महिला भाविक तांब्याच्या कळसांमध्ये पाणी आणतात. शंभू महादेव मंगलनाथ मंदिरात अभिषेक करतात. दीप अमावस्या निमित्त कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी 33 दिवसांच्या कालावधीमध्ये सव्वा लक्ष पार्थिव शिवलिंग स्थापन केले जाते. हे सर्व शिवलिंग तयार करण्यासाठी माजलगाव शहरातील आणि परिसरातील अनेक महिला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. अनेक भाविक-भक्त मोठ्या मनोभावे हे पार्थिवशील शिवलिंग तयार करण्यासाठी उत्सुक असतात.