छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीला सुरुवात, 27 फेऱ्यांनंतर समोर येणार निकाल - Lok Sabha Election Results 2024 - LOK SABHA ELECTION RESULTS 2024

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 1:03 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतमोजणीला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला बीड बायपास रस्त्यावर एमआयटी महाविद्यालय येथे सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा निहाय १४ तर पोस्टलसाठी १० टेबल असतील. मत मोजणीच्या २७ फेऱ्या होणार आहेत. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १२ तासाहून अधिक वेळ लागेल अशी शक्यता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वर्तवली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल, असे प्रशासकीय सूत्रांनी नमूद केले. लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया १३ रोजी पार पडली. त्यानंतर मतदान यंत्रे एमआयटी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रुममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली होती. त्याठिकाणी याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी मत मोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली होती.

२७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी : मत मोजणीसाठी विधानसभा निहाय १४ तर पोस्टलसाठी १० टेबल असतील. तर मत मोजणीसाठी एकूण २७ फेऱ्या होतील. त्यात मतदान केंद्राच्या संख्येनुसार औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्यच्या २३, पश्चिम २७, पूर्वच्या २२, गंगापूर आणि वैजापूर मतदारसंघाच्या प्रत्येकी २५ तर कन्नड विधानसभा मतदार संघाच्या २६ फेऱ्या होतील. प्रारंभीच्या एक ते तीन फेऱ्यांना २५ ते ३५ मिनिटे वेळ लागेल; पण त्यानंतरच्या फेऱ्यांना साधारणपणे १५ ते २० मिनिटे लागेल, अशी शक्यता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ही बाब लक्षात घेता मत मोजणीसाठी १२ तासाहून अधिक वेळ लागू शकतो; परंतु सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकालाबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.