'फिर एक बार मोदी सरकार'; हीच देशात हवा, मोदींच्यामुळे महाराष्ट्राचाही फायदा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 29, 2024, 11:05 AM IST
नागपूर Eknath Shinde On Pm Modi : यवतमाळ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "यवतमाळ इथं प्रचंड मोठी सभा होती. या सभेत महिलांची प्रचंड गर्दी होती. यवतमाळमध्ये मोदींची गॅरंटी चालली आहे. लोकांनी मोदींना हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची गॅरंटी दिली आहे. संपूर्ण देशात फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार असंच वातावरण आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनांचं लोकार्पण झालय. महाराष्ट्रासाठी देखील मोठी प्राप्ती होती," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांना वंचित आघाडीकडून उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत विचारलं असता, ते म्हणाले की "या विषयाची मला माहिती नाही. मी अजून ऐकलं नाही."