ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार, आपण बुलडोझर बाबा नसल्याचं केलं स्पष्ट - Drug free Maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 4:49 PM IST

thumbnail
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

मुंबई Drug free Maharashtra : राज्याचा अर्थसंकल्प आज पावसाळी अधिवेशनात मांडला. सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी निदर्शनं केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तरुण पिढीला ड्रग्जच्या आहारी जाऊ देणार नाही. पालकांच्या चिंता आम्हाला माहीत आहेत. त्यामुळं ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असं शिंदे म्हणाले. कुठेही अमली पदार्थ आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पब, बारवर छापे टाकले जात आहेत. त्यामुळं बुलडोझर बाबा अशी आपली नवी ओळख होत आहे. पण मी बुलडोझर बाबा नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज विधान भवनाबाहेर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.