मुंबई मॅरेथॉनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फडकवला प्रभू श्रीरामाचा भगवा झेंडा - मुंबई महानगर पालिका
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 21, 2024, 10:31 AM IST
|Updated : Jan 21, 2024, 12:13 PM IST
मुंबई Tata Mumbai Marathon 2024 : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये देशभरातून आलेल्या स्पर्धकांचा उत्साह दिसून आला. या मॅरेथॉनच्या ड्रीम रन या स्पर्धेत 20 हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला आहे. विविध सामाजिक कारणासाठी हे स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सामील झाले आहेत. संपूर्ण मुंबई नगरी या मॅरेथॉनमुळे रंगबिरंगी झाली असताना मॅरेथॉनच्या मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू श्री रामाचा झेंडा फडकवला. उद्या अयोध्येत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत असताना देशभर भक्तीचं वातावरण आहे. अशाप्रसंगी या मॅरेथॉनच्या उत्साहात एकनाथ शिंदे यांनी श्रीरामाचा भगवा झेंडा हातात घेऊन तो फडकवला. त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे सुद्धा उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ही मुंबई मॅरेथॉन मुंबईचीच नाही, तर संपूर्ण देशाची शान झाली आहे. 60 हजार स्पर्धक यामध्ये सामील झाले असून त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. या मॅरेथॉनचे प्रायोजक टाटा यांचा मिठापासून ते एअरलाईन्सपर्यंत प्रवास झाला असून सर्व क्षेत्रात ते अग्रेसर आहेत. या मॅरेथॉनमधील सामील झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मुंबईकर रस्तोरस्ती जमा झाले आहेत." मॅरेथॉनला 7:20 मिनिटांनी राज्यपाल रमेश बैस, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. या प्रकारात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंचा समावेश असून, या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास 50 हजार यूएस डॉलर इतकी इनामी राशी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. मागच्या वर्षी टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपिआच्या धावपटूंचा दबदबा राहिला होता. यंदाही त्यांच्याकडूनच जास्त अपेक्षा आहेत. मागील वर्षाचा विजेता हायले लेमी यांनी 2 तास 4 मिनिटं 33 सेकंद इतक्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली होती. यंदाही त्यांच्याकडून अपेक्षा असून इथोपियाचाच लेलिसा देसीसा हा धावपटू त्याचबरोबर किंदे आतानाव हा धावपटू सुद्धा लेमी यांना टक्कर देऊ शकतो. भारतीय धावपटूंमध्ये गोपी टी हा मागील वर्षाचा विजेता त्याचबरोबर कालिदास हिरावे यांच्यात चुरस बघायला भेटणार आहे.