पुणे सोलापूर महामार्गावर अपघात; रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीस्वारानं उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद - पादचाऱ्याला दुचाकीस्वारानं उडवलं
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02-02-2024/640-480-20648715-1006-20648715-1706863716909.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 2, 2024, 2:23 PM IST
पुणे Road Accident In Pune : रस्ता ओलांडताना दुचाकीस्वारानं दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. मात्र धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन गावात गुरुवारी रात्री घडली. साहेबआण्णा विठ्ठल आलुरे असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. तर जालिंदर शेंडगे असं दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोलापूर - पुणे महामार्गावर असलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या जालिंदर शेंडगे (वय- 45, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे रस्ता ओलांडत होते. यावेळी साहेबआण्णा विठ्ठल आलूरे (वय- 35, रा. मदारानी पराग, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हा दुचाकीस्वार भरधाव दुचाकीनं जात होता. यावेळी दुचाकीस्वारानं जालिंदर शेंडगे यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर जालिंदर शेंडगे हे रोडच्या बाजुला पडले. तर अपघातानंतर दुचाकीस्वार साहेबआण्णा हा रोडवर पडल्यानं त्याला गंभीर मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.