मुंबई IPL 2025 Dates and Vennues : बीसीसीआयनं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च 2025 रोजी सुरु होईल आणि अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) 22 मार्च रोजी कोलकाता येथील प्रतिष्ठित ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या सामन्याचं आयोजन करेल.
🚨 News 🚨
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
BCCI announces schedule for TATA IPL 2025
Details 🔽
13 शहरांत होणार सामने : या हंगामातील 74 सामने 13 ठिकाणी खेळवले जातील आणि त्यात 12 डबल-हेडर सामने असतील. दुपारचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 03:30 वाजता सुरू होतील, तर संध्याकाळचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 07:30 वाजता सुरु होतील. 12 डबल-हेडरपैकी पहिला सामना 23 मार्च रोजी होईल जेव्हा सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात दुपारच्या सामन्यात हैदराबादमध्ये मॅच होईल. त्यानंतर संध्याकाळी एक रोमांचक सामना होईल जिथं पाच वेळा आयपीएल विजेते असलेले चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आमनेसामने येतील.
धरमशाळा इथंही आयपीएल सामने : आयपीएलच्या 10 संघांपैकी तीन संघ प्रत्येकी दोन ठिकाणी खेळतील. दिल्ली कॅपिटल्स त्यांचे घरचे सामने विशाखापट्टणम आणि नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळतील. राजस्थान रॉयल्स (RR) त्यांचे दोन होम मॅच गुवाहाटीमध्ये खेळतील. जिथं ते KKR आणि CSK विरुद्धचे सामने खेळतील आणि उर्वरित होम मॅच जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळतील. पंजाब किंग्ज त्यांचे चार घरचे सामने न्यू पीसीए स्टेडियम, न्यू चंदीगड इथं खेळतील तर पंजाब त्यांचे तीन घरचे सामने लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धचे सामने धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळेल.
Tame taiyaar cho, Titans FAM? 😍 pic.twitter.com/Ref7t27qIN
— Gujarat Titans (@gujarat_titans) February 16, 2025
कोलकातामध्ये 10 वर्षांनी अंतिम सामना : लीग स्टेज फेऱ्या संपल्यानंतर आयपीएल 2025 चे प्लेऑफ सामने हैदराबाद आणि कोलकाता इथं खेळवले जातील. हैदराबादमध्ये अनुक्रमे 20 मे 2025 आणि 21 मे 2025 रोजी क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने होतील. त्यानंतर 23 मे 2025 रोजी कोलकाता क्वालिफायर 2 चं आयोजन करेल. आयपीएल 2025 चा अंतिम सामना 25 मे 2025 रोजी कोलकाता इथं खेळला जाईल. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर 10 वर्षांनंतर आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. याआधी, 2015 मध्ये इथं शेवटचा आयपीएल फायनल आयोजित करण्यात आला होता. त्या अंतिम सामन्यात, मुंबई इंडियन्स (MI) नं चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला हरवून जेतेपद जिंकलं होतं.
Mark your calendars, folks! 🥳🗓#TATAIPL 2025 kicks off on March 2️⃣2️⃣ with a clash between @KKRiders and @RCBTweets 🤜🤛
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
When is your favourite team's first match? 🤔 pic.twitter.com/f2tf3YcSyY
IPL चं संपुर्ण वेळापत्रक :
- मॅच 1: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, शनिवार, 22 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, कोलकाता
- मॅच 2: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, रविवार, 23 मार्च, दुपारी 3:30 वाजता, हैदराबाद
- मॅच 3: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार, 23 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, चेन्नई
- मॅच 4: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, सोमवार, 24 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, विशाखापट्टणम
- मॅच 5: गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, मंगळवार, 25 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, अहमदाबाद
- मॅच 6: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बुधवार, 26 मार्च, संध्याकाळी 07:30, गुवाहाटी
- मॅच 7: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, गुरुवार, 27 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
- मॅच 8: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, शुक्रवार, 28 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, चेन्नई
- मॅच 9 : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, शनिवार, 29 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, अहमदाबाद
- मॅच 10 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रविवार, 30 मार्च, दुपारी 3:30 वाजता, विशाखापट्टणम
- मॅच 11 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रविवार, 30 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, गुवाहाटी
- मॅच 12 : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मंगळवार, 31 मार्च, संध्याकाळी 07:30 वाजता, मुंबई
- मॅच 13 : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, बुधवार, 01 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, लखनऊ
- मॅच 14 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, बुधवार, 02 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, बेंगळुरु
- मॅच 15 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, गुरुवार, 03 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, कोलकाता
- मॅच 16 : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, शुक्रवार, 04 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, लखनऊ
- मॅच 17 : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शनिवार, 05 एप्रिल, दुपारी 3:30 वाजता, चेन्नई
- मॅच 18 : पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, शनिवार, 05 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, न्यू चंदीगड
- मॅच 19 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, रविवार, 06 एप्रिल, दुपारी 3:30 वाजता, कोलकाता
- मॅच 20 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स, रविवार, 06 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
𝑵𝒂𝒈𝒂𝒓 𝒎𝒆𝒊𝒏 𝒅𝒉𝒊𝒏𝒅𝒐𝒓𝒂 𝒑𝒊𝒕𝒘𝒂 𝒅𝒐, 𝒎𝒂𝒎𝒂 🗣
— Mumbai Indians (@mipaltan) February 16, 2025
🗓 𝗧𝗮𝘁𝗮 𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟱 schedule aa gaya hai! #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL pic.twitter.com/HoBuM6a8UT
- मॅच 21 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सोमवार, 07 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, मुंबई
- मॅच 22 : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मंगळवार, 08 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, न्यू चंदीगड
- मॅच 23 : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बुधवार, 09 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, अहमदाबाद
- मॅच 24 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, गुरुवार, 10 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, बेंगळुरु
- मॅच 25 : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, शुक्रवार, 11 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, चेन्नई
- मॅच 26 : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, शनिवार, 12 एप्रिल, दुपारी 3:30 वाजता, लखनऊ
- मॅच 27 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, शनिवार, 12 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
- मॅच 28 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, रविवार, 13 एप्रिल, दुपारी 3:30 वाजता, जयपूर
- मॅच 29 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार, 13 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, दिल्ली
- मॅच 30 : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सोमवार, 14 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, लखनऊ
- मॅच 31 : पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मंगळवार, 15 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, न्यू चंदीगड
- मॅच 32 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बुधवार, 16 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, दिल्ली
- मॅच 33 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, गुरुवार, 17 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, मुंबई
- मॅच 34 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज, शुक्रवार, 18 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, बेंगळुरू
- मॅच 35 : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शनिवार, 19 एप्रिल, दुपारी 03:30 वाजता, अहमदाबाद
- मॅच 36 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, शनिवार, 19 एप्रिल, सायंकाळी 07:30 वाजता, जयपूर
- मॅच 37: पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रविवार, 20 एप्रिल, दुपारी 03:30 वाजता, न्यू चंदीगड
- मॅच 38 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रविवार, 20 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, मुंबई
- मॅच 39 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स, सोमवार, 21 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, कोलकाता
- मॅच 40 : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मंगळवार, 22 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, लखनऊ
.@MumbaiIndiansTN, get ready for the 𝙀𝙡 𝘾𝙡𝙖𝙨𝙞𝙘𝙤 💪
— Mumbai Indians (@mipaltan) February 16, 2025
Paltan, நாங்க வரோம்! 👊#TATAIPL #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/E1XLD4zLsC
- मॅच 41 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, बुधवार, 23 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
- मॅच 42 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, गुरुवार, 24 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, बंगळुरू
- मॅच 43 : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, शुक्रवार, 25 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, चेन्नई
- मॅच 44 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, शनिवार, 26 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, कोलकाता
- मॅच 45 : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, रविवार, 27 एप्रिल, दुपारी 03:30 वाजता, मुंबई
- मॅच 46 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रविवार, 27 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, दिल्ली
- मॅच 47: राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, सोमवार, 28 एप्रिल, सायंकाळी 07:30 वाजता, जयपूर
- मॅच 48: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मंगळवार, 29 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, दिल्ली
- मॅच 49 : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, बुधवार, 30 एप्रिल, संध्याकाळी 07:30 वाजता, चेन्नई
- मॅच 50 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, गुरुवार, 01 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, जयपूर
- मॅच 51 : गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, शुक्रवार, 02 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, अहमदाबाद
- मॅच 52 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, शनिवार, 03 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, बेंगळुरु
- मॅच 53 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, रविवार, 04 मे, दुपारी 03:30 वाजता, कोलकाता
- मॅच 54 : पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, रविवार, 04 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, धर्मशाळा
- मॅच 55 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सोमवार, 05 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
- मॅच 56 : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मंगळवार, 06 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, मुंबई
- मॅच 57 : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, बुधवार, 7 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, कोलकाता
- मॅच 58 : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, गुरुवार, 08 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, धर्मशाळा
- मॅच 59 : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, शुक्रवार, 09 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, लखनऊ
- मॅच 60 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, शनिवार, 10 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
🚨 IPL 2025 Full Schedule Released! 🚨
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 16, 2025
🗓️ Here’s when, where, and who we’ll face in the #TataIPL2025. 🔥
We’re locking horns with CSK, RR, PBKS, KKR and DC twice. We play MI, GT, LSG and SRH once. 💪
Save the dates, 12th Man Army. We are ready to #PlayBold! 🙌 #ನಮ್ಮRCB… pic.twitter.com/92NpYAw8e3
- मॅच 61 : पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार, 11 मे, दुपारी 03:30 वाजता, धर्मशाळा
- मॅच 62 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, रविवार, 11 मे 25, संध्याकाळी 07:30 वाजता, दिल्ली
- मॅच 63 : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सोमवार, 12 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, चेन्नई
- मॅच 64 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मंगळवार, 13 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, बेंगळुरु
- मॅच 65 : गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, बुधवार, 14 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, अहमदाबाद
- मॅच 66 : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, गुरुवार, 15 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, मुंबई
- मॅच 67 : राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, शुक्रवार, 16 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, जयपूर
- मॅच 68 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, शनिवार, 17 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, बेंगळुरू
- मॅच 69 : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, रविवार, 18 मे, दुपारी 07:30 वाजता, अहमदाबाद
- मॅच 70 : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, रविवार, १८ मे-२५, संध्याकाळी 07:30 वाजता, लखनऊ
- मॅच 71 : क्वालिफायर 1, मंगळवार, 20 मे, सायंकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
- मॅच 72 : एलिमिनेटर, बुधवार, 21 मे, सायंकाळी 07:30 वाजता, हैदराबाद
- मॅच 73 : क्वालिफायर 2, शुक्रवार, 23 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, कोलकाता
- मॅच 74 : अंतिम सामना, रविवार, 25 मे, संध्याकाळी 07:30 वाजता, कोलकाता.
हेही वाचा :