मुंबई : उत्तर प्रदेशमधील महाकुंभ मेळाव्याला (Mahakumbh 2025) जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाकुंभ मेळाव्याला जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेतर्फे आता विशेष गाड्या (special trains for Mahakumbh 2025) चालवल्या जाणार आहेत. भाविकांना विनाव्यत्यय आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागातून या विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
'या' मार्गावर चालवल्या जाणार विशेष गाड्या : सीएसएमटी ते मऊ आणि परत सीएसएमटी या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या १४ फेऱ्या चालवल्या जातील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी आणि परत लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या ४ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. पुणे ते मऊ आणि परत पुणे या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या १२ फेऱ्या चालवल्या जातील. तर नागपूर ते दानापूर आणि परत नागपूर या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या १२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. इतर विभागांकडून चालवल्या जाणाऱ्या काही विशेष गाड्यादेखील मध्य रेल्वेच्या स्थानकांवरुन जाणार आहेत. त्यामुळं या गाड्यांचा लाभदेखील प्रवाशांना होईल.
- मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण
- नागपूर- नागपूर, सेवाग्राम, बल्लारशाह, चंद्रपूर, बैतुल, पांढुर्णा
- पुणे- पुणे, मिरज, अहमदनगर, दौंड
- भुसावळ- भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, खंडवा
- सोलापूर विभागातील सोलापूर येथून महाकुंभसाठी या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
'या' आहेत विशेष उपाययोजना : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकिट खिडक्या कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याशिवाय गर्दीचं नियोजन करण्यासाठी, पादचारी पुलांवर प्रवाशांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करुन नियोजन करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकातील उद्वाहने आणि सरकते जिने (एक्सीलेरेटर) यामध्ये प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी नियंत्रित स्वरुपात प्रवेश दिला जाईल. गर्दी जास्त असलेल्या गाड्या एकाच वेळी येऊ नयेत, याचीदेखील काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, नवी दिल्ली येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर या विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -