बारावी नापास, एमपीएससीच्या 30 मुख्य परीक्षा, अखेर भाऊसाहेब जाधव झाला पोलीस उपनिरीक्षक - Bhausaheb Jadhav Motivational Story

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 5:01 PM IST

बीड Police Inspector Story : बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात अनेक लोक आपली पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजूर म्हणून जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यात तर राज्यात देखील ऊस तोडणीसाठी जातात. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राज पिंपरी गावापासून काही अंतरावर असलेल्या मुळशी तांडा या डोंगराळ भागात वास्तव्यास असलेले भाऊसाहेब जाधव यांच्या वडिलांचा मूळ व्यवसाय शेती; बारावीमध्ये एक वेळेस नापास झाल्यानंतर पुन्हा एकदा बारावीची परीक्षा दिली आणि पास झाल्यानंतर पदवी शिक्षण शासकीय अभियांत्रिकी कॉलेज रायगड येथून पूर्ण करून अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंगचा चांगला जॉब मिळाला होता; मात्र आई-वडिलांचं स्वप्न होतं की, मुलांना मोठा साहेब व्हावं. परंतु, एमपीएससी परीक्षेमध्ये यश हे एका परीक्षेत येत नाही. हे आपण अनेक उदाहरण पाहिले आहेत. अनेक वेळा परीक्षा देऊनही अनेक विद्यार्थी अपयशी ठरतात. त्याच पद्धतीने भाऊसाहेब जाधव यांनी तब्बल एमपीएससीच्या 30 मुख्य परीक्षा देऊन देखील यश मिळत नव्हतं.

आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं : भाऊसाहेब जाधव यांनी अनेक वेळा परीक्षा दिल्या. या परीक्षेमध्ये पाहिजे तेवढी प्रगती पाहायला मिळाली नाही; मात्र 2024 मध्ये भाऊसाहेब जाधव यांना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळविलं आणि आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं. अनेक वर्ष आई-वडिलांनी ऊस तोडून आपल्या मुलांला शिकवलं. लहानाचं मोठं केलं आणि आज अनेक दिवसानंतर हे यश पाहायला मिळालं. त्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. आई-वडिलांच्या कष्टापुढे माझे हे कष्ट काहीच नाहीत, असं मत भाऊसाहेब जाधव यांनी व्यक्त केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.