'अण्णाभाऊ साठेंना सन्मानानं भारतरत्न द्या, अन्यथा...'; मातंग समाजाचा शिर्डीतील भारतरत्न परिषदेत सरकारला इशारा - Bharat Ratna Parishad
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 7, 2024, 10:53 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Bharat Ratna Parishad : आतापर्यंत विविध क्षेत्रातील लोकांना भारतरत्न देण्यात आलाय. मात्र देशासाठी मोठं योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांना अद्यापही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला नसल्यानं मातंग समाज आता आक्रमक झाल्याच बघायला मिळतंय. अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची मागणी करणारी पहिली परीषद शिर्डीत आयोजीत केल्यानंतर आता महाराष्ट्रभर भारतरत्न परीषदा घेतल्या जाणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही मागणी यापुर्वीच करण्यात आलेली आहे. आता पुन्हा मातंग समाजानं संघटीत होत शिर्डीत विराट प्रतिष्ठानच्या वतीनं भारतरत्न परिषदेचं आयोजन केलं होत. या परिषदेसाठी राज्यभरातील मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिर्डीत उपस्थित होते. या आधीच्या सरकारनं तसंच विद्यमान सरकारनं, कलाकार, गायक, क्रिकेटपटू अशा विविध क्षेत्रातील लोकांना भारतरत्न पुरस्कार दिलाय. मात्र देशासाठी मोठं योगदान असलेल्या लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांना अद्यापही भारतरत्न पुरस्कार दिला नसल्याची खंत कार्यकर्तांनी व्यक्त केलीय. सरकारनं सन्मानानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार घोषित करावा अन्यथा राज्यातील सर्व मातंग समाज एकत्र येवून थेट मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याच इशारा समाजानं दिलाय.