विखे विरुद्ध थोरात वाद : संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा संपूर्ण आढावा - JAYASHREE THORAT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 26, 2024, 9:39 PM IST
अहिल्यानगर (संगमनेर) : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (25 ऑक्टोबर) सुजय विखे यांची सभा झाली. या सभेदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर देशमुखांविरोधात थोरात समर्थक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. यावेळी जयश्री थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन करत वसंतराव देशमुख यांच्या अटकेची मागणी केली.
अनथा काढणार मोर्चा : दुसरीकडं सुजय विखे यांच्या समर्थनार्थ हल्ल्याचा निषेध करण्यासाठी, लोणीत निषेध सभा घेत दंगलखोरांवर सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल करा अन्यथा, उद्या संगमनेरात मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा सुजय विखेंनी पोलीस प्रशासनाला दिलाय.