केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे झाले घोड्यावर स्वार; नेमकं कारण काय? - प्रभू श्रीराम
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 21, 2024, 3:01 PM IST
|Updated : Jan 21, 2024, 3:09 PM IST
जालना Raosaheb Danve News : जालन्यात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली आहे. शहरातील आनंदवाडी येथील श्रीराम मंदिरापासून यात्रेला सुरुवात झाली. बडी सडक येथील श्रीराम मंदिरात या शोभा यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी श्रीरामांच्या घोषणेनं परिसर दणाणून गेल्याचं पाहायला मिळालं. या यात्रेत ढोल पथक, लेझीम पथक, संबळ पथक, भजनी मंडळ, टाळकरी-भजनी असे पारंपरिक वाद्य पथक सहभागी झाले आहेत. तसंच या मिरवणुकीत श्रीराम मंदिर समितीतर्फे प्रभू श्रीराम आणि सीता मातेचा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे. हा सजीव देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. तसंच या यात्रेत मोठ्या संख्येने राम भक्त सहभागी झाले आहेत. दरम्यान, या यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे घोड्यावर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं.